STORYMIRROR

Harshal Patil

Romance

3  

Harshal Patil

Romance

भेटीत तृष्टता मोठी

भेटीत तृष्टता मोठी

1 min
365

दोन रेशीम मनांच्या, ऋणानुबंधातून जिथून पडल्या गाठी, 

भेटीत तृष्टता मोठी.


तुझे अतुलनीय रूप, तुझे सुंदर तन, 

यातूनी जुडले आपले मन, 

जन्मांतरीच्या रेशीम धाग्यांचे मिलन झाले त्या नदीतीराकाठी, 

भेटीत तृष्टता मोठी.


बहरलेल्या त्या नवपल्लवांसारखे तुझे रूसणे-हसणे, 

तुझ्या कोमल स्पर्शाने माझे ते गहिवरणे, 

या सर्वांकरिता जिथून घडल्या आपल्या या अविस्मरणीय भेटी, 

भेटीत तृष्टता मोठी.


त्या तिन्ही सांजा, त्या तिन्ही प्रहरी, 

तुला पाहुनी हे रुसलेले मन माझे बहरी,

शब्द न् शब्द मनात साठवून ठेवणाऱ्या या आपल्या अनमोल गाठी, 

भेटीत तृष्टता मोठी.


कधी सुखा-दु:खाने तुझ्या जवळ येऊन बसलो अन् खुदकन पाहून हसलो, 

तुझे मनोरम रूप पाहुनी त्या शृंगार रसात मी फसलो, 

या उल्ल्हासित मनाने आकर्षीले मला तुझ्याकडे या संपूर्ण जीवनासाठी, 

भेटीत तृष्टता मोठी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance