STORYMIRROR

Harshal Patil

Others

3  

Harshal Patil

Others

आई

आई

1 min
211

जन्मदाती ती असते आई, 

सदैव आपल्या मुलांच्या मनात राही, 

उत्तम संस्कार देण्यात घेते ती कष्ट, 

परंतु हे सर्व करत असताना होत नाही तिची ताकद नष्ट। 


आभाळाच्या मायेगत वाढवते ती मुलांना, 

प्रतिसाद देते ती त्यांच्या छंद-कलागुणांना, 

असते ती देवासारखी आपला पाठीराखा, 

सदैव सांगत असते ती, "चांगली संगत राखा"! 


करते ती आम्हा सर्वांवर माया, 

आम्हाला स्वावलंबी बनवण्यात झिजवते ती तिची काया,

कोणाचे उपकार ती ठेवत नाही, 

इतरांचे वाईट चिंतणे हे तिला आवडत नाही। 

 

अशी ही आई घराचे मांगल्य असते, 

अशी ही आई घराचे पूर्णत्व असते, 

देते ती सर्वांना सदैव सूख, 

पण दाखवत नाही कधी आपले दू:ख। 


Rate this content
Log in