STORYMIRROR

Harshal Patil

Inspirational

3  

Harshal Patil

Inspirational

कुठतरी चुकतयं असं वाटतयं हो...!

कुठतरी चुकतयं असं वाटतयं हो...!

2 mins
351

भल्या-भल्यांच्या बत्त्या गूल करणारी मंडळी आज सर्वांना दिसते, 

परंतू दिवसभर राब-राब राबणारा तो कामगार कोणाला दिसत नाही आज, 

लाचारासारखा, दीनदुबळ्यावाणी तो नोकर, 

असभ्य वर्तणूक करून तोंडसुख घेऊ पाहणारा तो निर्दयी मालक आज दिसत नाही कोणाला, 

हे पाहून...कुठतरी चुकतय असं वाटतय हो!...... 


स्वत:ला शिवभक्त म्हणून घेणारी ही जनमंडळी, 

राष्ट्राचा वारसा असलेल्या त्या गड-किल्ल्यांवर " दिल " काढून डागडुजी करणारी ही मंडळी आज सर्रास आढळते, 

परंतु माझ्या शिवरायांचे सद्गूण अंगीकारणारा तो एकही मर्दमराठी मावळा आज कुठे आढळत नाही हो, 

हे पाहून...कुठतरी चुकतय असं वाटतय हो!...... 


शिवरायांविरूध्द अपशब्द बोलणाऱ्याला चोप देताना व्हिडिओ व्हायरल करणारे आज सगळीकडे दिसून येतात, 

परंतु त्याचं शिवपुत्र संभाजी महाराजांना " रंगीन" आणि " रंगेल " बोलणारे आज कोणाला दिसून येत नाहीत हो, 

गाडीच्या पाटीवर मोठ्या अभिमानाने " जगदंब " , " जय भवानी, जय शिवराय " यांचे नारे लिहिणारे आज जागोजागी पाहायला मिळतात, 

पण तिच गाडी जेव्हा एका 'बियर बार शाॅप' जवळ उभी असताना पाहून... 

कुठतरी चुकतय असं वाटतय हो!......


नेता-राजनेत्यांच्या मिरवणूका काढणारी मंडळीही खूप दिसतात हो, 

परंतु साऱ्या जगाचा " पोशिंदा " असणाऱ्या त्या बळीराजाच्या मिरवणूका काढणारा एकही माणूस आज दिसत नाही, 

मोठ-मोठया नफा मिळवणाऱ्या असंख्य कंपन्या आज पाहायला मिळतात, 

परंतु शेतमालाला योग्य भाव मिळाल्याने सुखाने आनंदून जाऊन, बेभान होऊन नाचणाऱ्या त्या शेतकर्यांच्या मुखावरील तो सोनेरी क्षण आज एकदाही पाहायला मिळत नाही हो, 

हे पाहून...कुठतरी चुकतय असं वाटतय हो!...... 


सरकारी कार्यालयात कामे करणारी अनेक मंडळी आज दिसतात, 

परंतु काम लवकर व्हावे म्हणून त्या गरीब शेतकऱ्याकडून पाचशे रुपयांची लाच घेणारा तो सरकारी कर्मचारी मात्र आज कोणाला दिसत नाही हो, 

अपार कष्ट सोललेल्या त्या दु:खी-कष्टी जन्मदात्या आईबापांना वृध्दाश्रमात पाहून... 

खरंच कुठतरी चुकतय असं वाटतय हो!......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational