STORYMIRROR

Harshal Patil

Inspirational

4  

Harshal Patil

Inspirational

✍🏻_विज्ञानाचे महामेरू - डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम_✍🏻

✍🏻_विज्ञानाचे महामेरू - डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम_✍🏻

1 min
203

मनात उत्तुंग इच्छाशक्ती वा गगनभरारी घेण्याची जिद्द असणारे हे गरिबाचे सुपुत्र झाले होते राष्ट्रपती, 

अरे! नसू देत ना श्रीमंत पैशांनी, परंतु श्रीमंत विचारांच्या बळावर होते हे लखपती, 

नाना यातना सोसूनी परंतु यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणारी

ती पेटती मशाल मनात ज्वलनशील ठेवून घेतले यांनी कष्ट, 

संकटांची परिसीमा गाठत-गाठता मात्र होऊ दिली नाही कधी त्यांनी ती ताकद नष्ट. 

शत्रूंना घाबरले नाहीत,मनी कायम धरिला होता तो ध्यास, 

कधी ना कधी प्रयत्नांना यश मिळेलचं अशी होती त्यांच्या मनी आस, 

दुर्दम्य इच्छाशक्ती वा अंतरी होता ठाम आत्मविश्वास, 

युवा पिढीचं बनवेल भारताला 'महासत्ता' हा होता त्यांचा पक्का विश्वास. 

प्रयत्नांची पराकाष्टा करूनी सफल केला यांनी आपला मुख्य हेतू, 

भविष्यातील आश्वासक चित्र अंतरंगात कल्पूनी उभारीला त्यांनी तो नवयुगीन विज्ञानाचा सेतू,

अग्निबाणाचा शोध लावूनी, दाखवून दिले त्यांनी ते परिश्रम, 

नवशोधाने घडविला इतिहास, कारण दूर करायचा होता ना तो इतरांच्या मनातील भ्रम. 

केवळ स्वत:प्रतिचा विचार न करता साऱ्या जगताचा विचार यांनी केला, 

नम्रतेने ओतप्रोत हा मानव म्हणूनच 'युगप्रवर्तक' झाला, 

'मिसाईल मॅन' ची संज्ञा देऊनी भूषविला हा थोर रत्न, 

घडविलेल्या कार्याची दखल घेऊनी भारत सरकारने बहाल केले यांस भारतरत्न! 

यशस्वी जीवनाच्या यशोगाथेचे मूर्तिमंत उदाहरण

असलेले हे महान शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम,

वाचन प्रेरणा दिनी चरणी नमूनी करितो या युगप्रवर्तकाला मी सलाम!, 

'मिसाईल मॅन' चा जन्मदिन असणारा हा सोनेरी क्षणांनी

गुंफलेला दिवस १५ ऑक्टोंबर आहे आज भव्य-दिव्य, 

अशा या युगप्रवर्तकाच्या अनमोल विचारांची ज्योत

मनात निरंतर ज्वलंत तेवत राहावी म्हणून रचिले मी हे काव्य!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational