मन
मन
तू नाहीस हे मला मीच कितीदा सांगू.!!!
तुझ्या नजरेतली ती आस, स्वप्नांत ही तू असणे!
ती ओढ लावणारे बोल तुझे
मी माझ्यातच कितीदा जपू रे!
नाहिस येणार, तू होऊनी मेघ सावळा
नाही बहरणार ही सायली ही पुन्हा ,!
तू म्हण वेडं याला, प्रेम असेचअसतं रे, कोण समजवेल तुला, !
तू नाहिस येणार परतुनी हे मीच मला कितिदा सांगू ?
धुसर वाटा, धुकं दाटल्ं, तुला वाटेल वर्णनं ही थंडीची!
आतुर मन मिलना राजसा, प्रीती खुणावते तुला एकांती!
चित्रकथा ही माझ्या मनीची नव्हे वर्णनं गुलाबी थंडीची !
नजरेला ओढ तुझ्या येण्याची, आतुर ही प्रीती तू भेटशील !
स्वागता सज्ज रातराणी ही नतुझ्यासाठी सज्ज चाफा ही आज!
तुझ्या नजरेतील ओढ अनामिक मी, जपली प्रीती मी तुझी हृदयांतरी ह्या.!
तू नाहिस माझा तरी झुरते ही, नाही बहरणार ही सायली पुन्हा कधीही !
तू नाहीस म्हणून ती न रहिली बाहरण्याची ,
तू नाहीस म्हणून बरसतो हा पाऊसही,!
तू नाहीस पण मी आज ही जिवंत आहे,
तू नाहीस येणार ह्या वाटेनि कधीच परतुनी!
तेच मनाला पटवून देत तिथेच उभी आजही मी,
तू गेलास जगवूनी प्रीती ह्या मनी स्मरते नित्य मी,!
त्या क्षणांची साक्ष देतात ह्या फ़ुलवेली न निसर्गही !
भुलवतात मला,तुझ्या प्रेमाची साक्ष देतात क्षणोक्षणी!
सांगतात कानी कहाणी तुझेच गीत गुणगुणत फसवतात आजही!
येणार तू पुन्हा मजसाठी तूझी प्रीती रुजवतात पुन्हा,ह्या मनी!
तू नाहीस हे मला मीच देते पटवूनी न समजावते की,
तू नाहिस येणार परतुनी,
तू नाहीस माझा हे मीच मला कितिदा सांगू,
नाहीच समजणार ह्या मनाला
त्यालाही सवय तुझ्याच समजावणीची,
तू तर नाही ना येणार समजावे की त्याला!
मी कितीदा सांगू माझ्याच मनाला !
तू नाहीस येणार परतुनी, कितीदा सांगू मीच मला!

