सांगायचं होतं बरचं काही राहून गेल सारचं काहीं..........
सांगायचं होतं बरचं काही राहून गेल सारचं काहीं..........
आठवते का तुम्हाला जेव्हा selection माझं झालं होत
आणि तुमच्या ओठांमधलं कौतुक अन डोळ्यातलं पाणी अगदी खरंखुरं होतं
तो डोळ्यांमधला आनंद ओठांवाटे बाहेर पळत सुटायचा
अन् ज्याला त्याला माझं कौतुक सांगत बसायचां
तरी सुद्धा बाबा मला तुम्हाला सांगायचं होतं बरचं काही राहून गेलं सारं काही.
लहानपणी मला एखाद्याची नक्कल करताना पाहून पोट धरून हसायचातं ,
मग का कोणालाही न सांगता एकटे बसून रडायचातं,
तरी देखील सांगायचं होत बरच काही राहून गेलं सारचं काही
कॉलेजमध्ये असताना मला भीतीच वाटली सुरुवातीला,
की मैत्रिणीने घरी आणलेल्या डब्याला तुम्ही कसे react व्हाल ते ?
पण मला कदाचित तेव्हा कळलं नसेल की तुम्ही ईतके cool असाल ते
तरीदेखील बाबा मला सांगायचं होत बरचं काही राहून गेलं सारचं काही
मित्राप्रमाणे सल्ला द्यायचा बाहेर जाताना नेहमी कुठले टी शर्ट घालायचा,
मग आयुष्यातला तो क्षण का निसटवलात मित्राप्रमाणे स्वतःच स्वतःहून व्यक्त होण्याचा,
तरी पण बाबा सांगायचं होतं बरचं काही राहून गेल सारचं काहीं
अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुमच्याकडून थोडा हट्ट करून का होईना मिळवली नसेल,
अगदी लहानपणी bike वर बसण्यापासून ते मोठे झाल्यावर तुमच्यासोबत डॉक्टर कडे येण्यापर्यंत असेल
घरापासून लांब गेल्यानंतर तुमच्यातलं आणि माझ्यातलं अंतर फार वाढलं,
त्यावेळीदेखील तुमच्याकडून माझं खूप काही ऐकायचं आणि तुम्ही सांगायचं टाळलतं
तेव्हा सुद्धा सांगायचं होतं बरेच काहीराहून गेलं सारेच काही
इतरांसाठी झगडता झगडता दुःख मनात साठवून राहिलात ,
स्वतःची काळजी न करता आम्हाला अर्ध्यावर सोडून गेलात
मला ठाऊक आहे बाबा तुम्ही माझ्यासोबत नेहमी राहणार ,
पण ते भोवतालच्या गर्दीला कधीच नाही कळणार तरीदेखील
ज्यांना जगात तोडच नाही असे जणू तुम्ही कायम माझ्यासोबत होते ,
कुठही असेना का आता ते देवाचे घर इथून कितीसे दूर होते?
तरी सुद्धा बाबा मला सांगायचं होतं बरचं काही राहून गेलं सारेच काही .
