ढाल...
ढाल...
प्रेम कधी डोळ्यात नाही पण मनात साठवून ठेवणारा
सतत भांडणारा चिडवणारा प्रेम बोलण्यातून नाहीतर डोळ्यातून व्यक्त करणारा
वेळ पडली तर एकदाच हा मला शिव्यादेखील ऐकून घेणारा
माझ्या विरोधात एक शब्दही सहन करणारा
जर का नकळत पाणी आलं डोळ्यात तर काय माती खाल्लीस बोल पटकन असं खडसावून विचारणारा
कितीही दमलास तरी माझे सगळे हट्ट पूर्ण करता करता स्वतःच हरवणारा
हे बघ भावड्या ही राखी वगैरे तर कोणी आहे का राखीच्या धाग्यावरून ठरवता येत
नात्यातली दृढता आपल्यासाठी कारण ती अशीच ढाल म्हणून राहिली आयुष्यभर माझ्यासाठी...
