STORYMIRROR

Priyanka Damare

Romance Others

3  

Priyanka Damare

Romance Others

आगंतुक..

आगंतुक..

1 min
381

कॉलेजला असताना

सगळ्यांच्या गर्दीमध्ये

 तोदेखील असायचा

स्वतःच व्यक्त अस्तित्व शोधत

पण मी पण मी मात्र त्याला शोधायचे

का कुणास ठाऊक

चुकून का नजरानजर झालीच

 तर मी अचानक टाळायचे

 उगाच लक्ष नसल्याचा दाखवायचे

 सामाजिकतेचे प्रश्न सोडवता सोडवता

मला माझा स्वतःचा एक प्रश्न पडायचा

आणि परत येऊन भानावर

माझा प्रश्न कुणास ठाऊक कुठे जायचा

तो सहज येऊन हसून जायचा आणि

त्याचा नादात माझा प्रेझेंटी चा 

तास आपोआप लागायचा

 त्याचं माझ्या आयुष्यात येणं

हे कदाचित आगंतुकाप्रमाणे असेल

पण माझं त्याच्यात मोहरंण हे ऋतू वसंता प्रमाणे होत..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance