तू अस अचानक यायला नको....
तू अस अचानक यायला नको....
तू अस अचानक यायला नको होतस पावसा
तुझ्या ह्या अश्या unwanted येण्याने जाणवतंय अवदसा
एवढा कसला वैताग आलाय रे तुला की
एक एक करून सर्वांच्या जिवावर बेतला
आयुष्यभराची तुटुपुंजी जमा असलेल्या त्या गावकऱ्यांवर चिडलास
तू असं अचानक यायला नको होतंस पावसा मान्य आहे
माणसांची पाप वाढलीही असतील फार पण मग त्या निष्पाप जीवांच
अन प्राण्यांच काय ? तु तर त्यांनाही नाही केलंस माफ
तरीदेखील तु असं अचानक यायला नको
होतंस पावसा तू पटकन ठरवून मोकळा होंतोस
हे अमुक तमुक जन्माच्या पाप पुण्याचे परिणाम
पण त्या जीवांच काय जी त्यांच संपूर्ण आयुष्य
एकाच जन्मात जगण्याचा प्रयत्न करतात
निदान त्यांचा विचार करून देखील तू अश्या रीतीने यायला नको होतंस
आमच्यातली माणुसकी टिकून आहे का नाही
हे पडताळून पाहण्याकरिता जर तू असा उद्रेक केला असेल
तर नको ह्या सगळ्याची गरज कारण ती अजूनही शाश्वत आहे
म्हणून तर मानवरूपी देव सैन्याच्या अन रेस्क्यू च्या रूपात
जमिनीवर अवतरले आहेत म्हणुन चं तू अस अचानक यायला नको होतस....
