आणि त्यांचे व्यथा मांडण्यात माझे शब्द अपुरे पडले...!
आणि त्यांचे व्यथा मांडण्यात माझे शब्द अपुरे पडले...!


पक्ष्यांनी स्वत: झाडांवरती घरटे बांधले,
मानवाने तेच झाडे तोडुन जंगल संपवले,
आता मानवच काॅक्रीटच्या घरट्यांमध्ये अडकले,
आणि पक्ष्यांच्या व्यथा मांडण्यात माझे शब्द अपुरे पडले...!
मानवाने त्या नदीला स्वत:चे देव मानले,
त्याच नदीमध्ये नंतर सांडपाणी सोडुन प्रदुषित केले,
आता नदीने रौद्र रुप धारण करून महापूर पसरवले,
आणि नदीची व्यथा मांडण्यात माझे शब्द अपुरे पडले...!
झाडांच्या व पाऊसाच्या मैत्रीला खुप वर्ष लोटले,
मानवाने झांडांएवजी विजेची झाडे उभा केले,
नंतर पाऊसाने त्याचा बदला घेऊन दुष्काळास आमंत्रण दिले,
आणि पाऊसाची व्यथा मांडण्यात माझे शब्द अपुरे पडले...!
जंगली प्राणी पुर्वी निर्सगात मुक्तपणे फिरत होते,
परंतु मानवाने त्यांचे स्वतंत्र्य हिरावून घेतले,
आज मानवच कैदखाण्यात जाऊन बसले,
आणि जंगली प्राण्यांची व्यथा मांडण्यात माझे शब्द अपुरे पडले...!
मानवाने आपल्याच जमिनीवर भेगा पाडले,
या महान कार्यामुळे त्या ओझोनलाही भेगा पडले,
मानवच आता सगळीकडे बोंबलत बसले,
आणि वातावरणाची व्यथा मांडण्यात माझे शब्द अपुरे पडले...!
जिथे जाईल तिथे मानवाने प्रदुषनच केले,
या सुशोभनीय वातावरणाचे सौंदर्याचं हरवले,
निर्सगाने स्वत:ची मुले त्याच्यापासुन दुर जाताना पाहिले,
आणि निर्सगाती व्यथा मांडण्यात माझे शब्द अपुरे पडले...!