STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

3  

Bharati Sawant

Romance

प्रेमकाव्य

प्रेमकाव्य

1 min
933



धुंद अलवार

होऊनि सजना

फिरू उपवनी

हात हाती घे ना


अवखळ मस्त

नार मी देखणी

अशी गुलछडी

मीच सुलक्षणी


आली जीवनात

ही प्रियसंगिनी

सख्या प्रीत केली

मी मनापासूनि


वेचिलेस क्षण

. मोहात पडूनी

तुच प्रियतम

मी तुझी रागिनी


जवळी ये आता

सोड मोहमाया

पाडलीस भूल

दे प्रेमाची छाया


नको फसवुस

या अशा घडीला

लाविला जिव्हाळा

या प्रेमवेडीला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance