STORYMIRROR

Sunita Anabhule

Romance

3  

Sunita Anabhule

Romance

उधळीत रंग, आला वसंत

उधळीत रंग, आला वसंत

1 min
791


उधळत रंग, आला वसंत*


म्हणती सारे आला वसंत,

रंगांची उधळण करीत,

पानगळीने करुनी स्वागत,

नव उन्मेषाची करी सुरुवात,

म्हणती सारे आला वसंत !!१!!


नववधू परी लेऊन साज,

चैतन्याची देतो गाज,

तारुण्याचा दावी माज,

पालवी फुटेल येता वसंत,

म्हणती सारे आला वसंत !!२!!


ऋतूंचा राजा असे तो,

धरणीला हिरवाई देतो,

सृजनाचे डोहाळे पुरवतो,

प्रणयाचा तो बहर फुलता,

म्हणती सारे आला वसंत !!३!!


प्रेमाचा मग होई वर्षाव,

धरणी घेई आकाशी धाव,

मुसमुसत्या तारुण्याचा प्रभाव,

अधरांनी अधरांचे घेता चुंबन,

म्हणती सारे आला वसंत !!४!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance