STORYMIRROR

Sunita Anabhule

Inspirational

3  

Sunita Anabhule

Inspirational

ऋणानुबंध

ऋणानुबंध

1 min
143

नाळेने जोडले जाते,

आई बाळाचे नाते,

तिच्या रक्त मांसाचे,

असते अव्यक्त नाते।। १।।


जन्मोजन्मीचे ऋण ते,

कशाने ना फिटायचे,

चामड्याचे जोडे केले,

तरी ऋण ना संपायचे।। २।।


मातेच्या वात्सल्याला,

जरी ओतल्या रकमा,

अनमोल तिच्या त्यागाला

जगी नाही रे उपमा ।। ३।।


माय लेकराचा ऋणानुबंध,

असे जन्मोत्सव सोहळा,

आमुच्या प्रितीचा हा गंध,

असे सृजनाचा डोहळा।। ४।।


मातेच्या ममतेचा बाजार,

जरी करतो जन सारा,

तरी मातेचा गर्भधारा,

बालकल्याणाचा उभारा।। ५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational