मैत्री
मैत्री
मैत्री
न स्मरे जुळती कशी?
नाती मैत्रीची गोडशी,
रक्ताच्या नात्यालाही,
सोडती मागे जशी !!
इंद्रधनुचा रंग वाटे,
वर्षानुवर्षांचा संग,
आठवांचा डोह दाटे,
सहवासाचा अभंग !!
गंधफुले उमलली,
स्मृतिगंधात न्हाली,
दवबिंदू परी डवरली,
सोनपावली आली !!
मैत्रीच्या त्या गोड स्मृती,
सुवर्णाक्षरांनी रेखाटती,
सुगंधा परी मखमली,
काळजात गोंदवती !!
सौ. सुनिता प्रभावती पांडुरंग अनभुले. मुंबई.
