बा विठ्ठला...
बा विठ्ठला...
कुठे ठेवू तवं माथा,
मज सांग देवराया,
धूळ तुझ्या चरणाची,
शोभे टिळा कपाळाया!!1!!
आस लागे दर्शनाची,
वाहे नेत्री अश्रुधारा,
बाविठ्ठला मायबापा,
करी माया कृपाकरा !!2!!
तन मन पायावरी,
सारे वाही पांडुरंगा,
नाम तुझे माझ्यासाठी
तीर्थ भगीरथ गंगा !!3!!
आसावला पळभर,
वारकरी वाळवंटी,
दिव्य पताका वैष्णवी
दुमदुमे आसमंती!!4!!
मुखी विठ्ठल विठ्ठल,
घुमे नाद पंढरीत,
पावलांची लगबग,
मन दंग दर्शनात !!5!!
