STORYMIRROR

Sunita Anabhule

Classics Inspirational

3  

Sunita Anabhule

Classics Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
10

महाराष्ट्रभूमी संतांची,

किर्तीवंतांची असे शान,

इथे जन्मली थोर रत्ने,

तयांचा आम्हा अभिमान ।।


जन्मभूमी ती शिवबाची,

थोरवी गाती साहसाची,

स्वराज्य रक्षक राणाची,

परंपरा जपती शौर्याची ।।


कला, संस्कृती, परंपरा,

सह्याद्रीचा उंच कडा,

सौंदर्याचा लाभे वारसा,

सदैव रक्षणा अखंड खडा ।।


शाहू,आंबेडकर फुल्यांनी,

समतेची शिकवण दिधली,

बंधुभावाचे करुन संवर्धन,

विविधतेत एकता जपली ।।


असा आहे माझा बलशाली महाराष्ट्र,

करुनी उत्सव गातो बलिदानाची गाथा

सांडले रक्त घडविण्या महाराष्ट्रा,

होतो नतमस्तक झुकवूनी माथा ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics