STORYMIRROR

Sunita Anabhule

Tragedy Inspirational Others

3  

Sunita Anabhule

Tragedy Inspirational Others

आमचे जगणे

आमचे जगणे

1 min
12

नका खचू भ्याड अपयशाने,

जीवन संपून जाईल भयाने,

परिस्थितीशी जुळवून घेणे,

असे असावे आमुचे जगणे !!१


तुझे माझे सोडून देणे,

सोडून "मीपण"आपले होणे,

इतरांसाठी केवळ नुरणे,

सोशल व्हावे आमुचे जगणे !!२


नवे जोडुनी जुने तोडणे,

भूत सोडून भविष्य जोडणे,

पोकळ खोटा दिखावा करणे,

असे नसावे आमुचे जगणे !! ३


सरता जुने येते वर्ष नवे 

वाटते सर्वांना हवे हवे

रामराज्याचे लेवून लेणे, 

करुया स्वागत हर्षभराणे,

असे असावे आमुचे जगणे !!४


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy