कातरा
कातरा
एक कातरा आठव सजना,
आपल्या अनवट भेटीचा !!
कोरला हृदयी दागिना,
आपल्या सल्लज प्रितीचा !! 1!!
भेट एकदा पुनश्च घडूदे,
अलवार दिठीत धुंदकुंद,
चांदण्याचा तो प्रणयगंध,
हृदयी वसंत श्वास बेधुंद !! 2!!
नयनमनोहर सलज्ज हसले,
अधरी दाटले भाव मनीचे,
उरी पारवे घुमू लागले
शब्द थिजले भावनांचे !! 3!!
स्वप्न वीरता होई निश्चल,
विरल्या क्षणांचा मांडे हिशेब,
दैवास सदा विचारी जाब,
अपूर्णत्वास समजे नशीब !!4!!