STORYMIRROR

Sunita Anabhule

Tragedy Inspirational

3  

Sunita Anabhule

Tragedy Inspirational

वेदना स्त्री मनाची

वेदना स्त्री मनाची

1 min
120

साचलेल्या कोनाड्यात,

दाटलेल्या आठवणी,

दबलेल्या आवाजात,

हुंदक्यांचीच विराणी !! १!!


बुरसट विचारांना, 

खळग्याचीच पेरणी, 

अंधारलेल्या वाटांना, 

अहंकाराची फोडणी !! २!!


ओलावल्या पापण्यांना,

सुखाच्याच आठवणी

दुर्मुखल्या चेहऱ्यांना,

कारुण्याची चाळणी!!३!!


सैलावल्या तनमना,

स्पर्शाची भुलावणी,

मिटलेल्या पापण्यांना,

प्राणाचीच आळवणी !!४!!


स्त्रीमनीची वेदना,

विटंबनेची बोचणी 

गुढत्वाची संभावना,

मनामनाची टोचणी !!५!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy