STORYMIRROR

Umesh Dhaske

Romance Tragedy

3  

Umesh Dhaske

Romance Tragedy

तू माझा झालाच नाहीस..!

तू माझा झालाच नाहीस..!

1 min
236

मी गीत होते तुझ्या स्वरांचे

पण सूर तू झालाच नाहीस.....

मी वात होते जन्मभराची

पण ज्योत माझी तू झालाच नाहीस......


मी आयुष्यभर न संपणारं

 पुस्तक तुझे होते

पण तू वाचक मात्र झालाच नाहीस.....

मी सोबत होते तुझ्या सदैव

पण तू साथ माझी झालाच नाहीस.....


मी वेदना तुझीच झाले

पण तू भावना माझी झालाच नाहीस.......

मी वाट तुझी झाले

पण पाऊल माझे तू झालाच नाहीस.......


मी बोल तुझेच झाले

तू शब्द माझे झालाच नाहीस.....

मी दृष्टी तुझी झाले

तू अश्रू माझे झालाच नाहीस......


मी श्वास तुझाच झाले

तू विश्वास माझा झाला नाहीस.....

मी हर्ष तुझा झाले

तू दुःख माझे झालाच नाहीस......


मी संयम तुझा झाले

तू धीर थोडा धरलाच नाहीस...

मी आयुष्यभर तुझीच राहीले

तू मात्र आयुष्य माझं झालाच नाहीस....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance