STORYMIRROR

Umesh Dhaske

Children

3  

Umesh Dhaske

Children

प्राण्यांची दिवाळी

प्राण्यांची दिवाळी

1 min
215


आली आली आली

प्राण्यांची दिवाळी

माकडाने आनंदाने

वाजवली टाळी...!


मनीमाऊने वळल्या

 चकल्या छान

अस्वलाने बांधले 

लाडू मऊशार....!


करंज्या बनवल्या 

खारुताईने खुसखुशीत

अनारसे बनवले 

हरिणबाईंनी भुसभुसशीत...!


कोल्ह्याने,लांडग्याने

फराळावर मारला ताव

म्हणाले, "सगळ्यांना

ताव मारके खाव"....!


लांडोरीने काढली 

सुरेख रांगोळी

उंदराने फोडली

फटाक्यांची गोळी...!


हत्तीसाहेबांनी बांधले

सार्‍या जंगलाला तोरणं

घोडेभाऊंचं थांबेना

काही केल्या घोरणं...!


दिवे लावले सांबराने

आरती केली सिंहाने

फुलांच्या हारामध्ये

नृत्य केले वाघाने...!


गोडधोड खाऊन

प्राण्यांची साजरी झाली दिवाळी

चित्ता हसून म्हणतो कसा

"कधी आहे हो होळी ?"



Rate this content
Log in

Similar marathi poem from Children