नंदीवाला
नंदीवाला
गुबूगुबू नंदीवाला आला रे आला
चिमुरड्यांचा गोतावळा बघा अंगणी गोळा झाला...!
पाठीवर झुलं आणि भाळी
चंद्रकोर
पिळदार आडदांड नंदीचे
शरीर
आल्या आल्या नंदी आनंद सार्यांनाच झाला
गुबूगुबू...१
भोलानाथ नंदी
हलवितो मान
विचारा हो प्रश्न
थोरला अन लहान
नंदीवाला बोले कानी
नंदीने कान टवकारला
गुबूगुबू...२
नंदीवाला फिरे
घरोघरी नाचूनिया
दावी मुलाबाळांना
गाणी सुरात गाऊनिया
रंगढंगात सजला नंदी
आनंदूनी गेला
गुबूगुबू....३