STORYMIRROR

Umesh Dhaske

Inspirational

3  

Umesh Dhaske

Inspirational

मित्रा

मित्रा

1 min
203

कडेकपारीतूनी कोसळणारा 

जणू उंच धबधबा तू मित्रा

 शेतशिवार फुलविणारा

लेक मातीचा तू मित्रा...!


वाढत्या लतेचा जणू

आधार तू मित्रा

जीवास जीव देणारा

जिवलग जणू तू मित्रा...!


उंच गगन भरारीची 

जणू दिशा तूच मित्रा

संकटांशी दोन हात 

करणारा सारथी जणू 

तू मित्रा...!


शेतमळ्याचं पाणी

अन वार्‍याची लहर तू मित्रा

कष्टाची भाजीभाकर 

तुझी गोडच सदा मित्रा...!


वेदनेचे मलम अन

श्वासातला विश्वास तू मित्रा

निराश मनांना चिरणारं

स्मितहास्य जणू तू मित्रा.....!


खट्याळ,लडिवाळ 

मिश्किल हसरा जणू तू मित्रा

धीर,धाडसी ,संयमी

स्वावलंबी तूच मित्रा...!


दुःखाची परिभाषा 

जाणणारा फक्त तूच मित्रा

सुख पेलावयाचे 

आत्मबळ जणू तूच मित्रा....!


हित कल्याणाचे 

स्वहित ना जपलेस मित्रा

आयुष्य हे माझे

सुंगधी केलेस तू मित्रा


आयुष्य हे माझे

सुंगधी केलेस तू मित्रा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational