STORYMIRROR

Umesh Dhaske

Romance

3  

Umesh Dhaske

Romance

प्रेमपत्र..!

प्रेमपत्र..!

1 min
157

प्रिय,

..........


सजले आज तारे नभी

तेजाचे नवं आभाळ सजले

जन्मोत्सव प्रिये तुझा अन

सुगंधी फुलांनी जग हे फुलले...


आयुष्य हे तुझ्यासोबती

तुझ्यासोबत जन्म नवा

नातं आपुलं जिव्हाळ्याचं

अन विश्वासाचा श्वास नवा....


तुझे चालणे तुझे बोलणे

तुझे हसरे मुख भावे मजला

तुझी साथ अन तुझे विवेक

आयुष्यभर जगवतील मजला...


जन्मदिनाच्या गोड प्रियेला

शुभेच्छा आभाळभरुनी देतो

दृष्ट कुणाची लागो न तुजला

इश्वराकडे मागणे हे मागतो..


गोड अशी तू गोड रहा स्मितहास्य कर पुन्हा पुन्हा

वचन देतो प्रिये मी तुजला

करणार नाही कधी गुन्हा...


तुझ्या इच्छा आकांक्षाना

नवी पालवी बहरु दे

नवस्वप्नांच्या माळेमध्ये 

मोती बनूनी मज राहू दे....


उदंड आयुष्य लाभो सजणे

तुला अन तुझ्या स्वप्नांना

जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो

माझ्या काळजाच्या ठोक्यांना...


अभिष्टचिंतन तुझे प्रिये गं

ओल्या पापण्या करु नकोस

माग प्रिये तू काहीही मज

काळीज माझे मागू नकोस...


काळजाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...


तुझाच....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance