STORYMIRROR

Umesh Dhaske

Abstract

2  

Umesh Dhaske

Abstract

विरह...!

विरह...!

1 min
33

रंग आता मी प्रितीचे

सभोवार उधळणार नाही

त्या फुलांचा सुगंध मी मुळी

आता घेणार नाही...!


ओठांतील स्मित तुझे

मी आता स्मरणार नाही

शब्द ते प्रेमाचे तुझे

मी कधीच बोलणार नाही...!


बेधुंद मनाला आता

मोकळीक मी देणार नाही

अश्रूंना वाट आता मी

मोकळी करुनी देणार नाही...!


हेलकावे आंधळ्या प्रीतीचे

मी आता घेणार नाही

अविश्वासाची पाने आता

मी कधीच चाळणार नाही...!


फडफडणार्‍या काळजाला

मी आता जाळणार नाही

तडफडलेल्या मेंदूस अजून

खतपाणी मी घालणार नाही...!


वळणाची तुझी वाट 

मी कधी धरणार नाही

संयमाचा घाट मी मुळीच

आता सोडणार नाही...!


आणाभाका आयुष्याच्या 

घेतल्या जिथे मिळूनी

ती जागा पुन्हा कधी मी

खोदणार नाही

अमृत म्हणून विष ते मी

प्रिये कधी चाखणार नाही...!


आयुष्यात तुझ्या नवे

रंग भरतीलही पुन्हा

खरं सांगतो प्रिये,

त्यात कधी मी रंगणार नाही..

विरुन गेलो आहे आता मी असा

 तुला कधीच मी दिसणार नाही..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract