STORYMIRROR

Umesh Dhaske

Romance

2  

Umesh Dhaske

Romance

लावणी...!

लावणी...!

1 min
70

अशी नजर लाविता का हो

ऐन भरात आलीया ज्वानी..२

काय बघून सांगा राया

तुमच्या तोंडाला सुटलयं पाणी....||धृ||


नार देखणी मी सजणा

उभ्या बांध्याची मी शेलाटी

काळ्याभोर केसांमंदी

मी माळली गं शेवंती

  माझ्या नाकी नथ मोत्याची

  साज नेसले पैठणी बाई

 लांलबुंद भाळी चंद्रकोर

 कानी डुल हे झुल्यावाणी

 ऐन जवानीची ही लाली माझ्या दिसतीया गालावरती..

काय बघून सांगा राया तुमच्या तोंडाला सुटलय पाणी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance