STORYMIRROR

Umesh Dhaske

Drama

3  

Umesh Dhaske

Drama

मी अनुभवलेला पाऊस

मी अनुभवलेला पाऊस

1 min
127

ओल्या आसमंतास मी

पाझरताना पाहिले,

हळूवार मेघसरींना मी

बरसताना पाहिले..!


पाकोळीस फुलांवर 

विहारताना मी पाहिले

गवतफुलांवर सरींना,

झुलताना मी पाहिले...!


गवत पात्यांवर जळथेंब खेळताना मी पाहिले

ओल्या मातीचा गंध,

श्वासात भरुनी घेताना मी पाहिले...!


डोंगर हिरवे,खळाळते झरे

सृष्टी सौंदर्य मी पाहिले

हसरी मनं ,खुलती फुलं,

उमलताना मी पाहिले...!


इवली नाव पाण्यामधे

लहरताना मी पाहिले

मेघ तुषारांना निसर्ग

घडविताना मी पाहिले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama