खेळ मांडला
खेळ मांडला
निर्मळ मनाला सर्व जग चांगलेच दिसले
कधीकाळी वाटत होते सर्वच आपले
ते खरे नाही कळतच गहिवरून आले
मनी दुःखाचे, नयनी अश्रूंचे ढग दाटले
थक्क झालो होतो बघून संकटसमयी
आपले म्हणवणाऱ्यांचा खराखुरा चेहरा
जिवनपथावर मार्गक्रमण सोडले नाही
फक्त वेळकाळ बघून बदलला मोहरा
हरलो तरी कच खालली नाही आम्ही
नव्हे किंचितही चित्ताचा धीर सांडला
सर्व शक्तिनिशी, धैर्य एकवटून परतलो
नव्या पटावर जीवनाचा खेळ मांडला
