निसर्गनियम
निसर्गनियम
1 min
209
पक्ष्यांची गगनभरारी बघून वाटतं
त्यांच्याप्रमाणे आपणही उडावे
निरभ्र आकाशाचे निरनिराळे रंग
सर्वांगात अगदी शोषून घ्यावे
नासाडी न करता निसर्ग देवाची
त्याने दिलेले मनःपूर्वक जपावे
कृत्रिमता कमी व्हावी जगतात
सर्वकाही निसर्गनियमाने घडावे
तेच ते रटाळ जगणे मागे सोडून
स्वच्छंदपणे हसावे, रडावे, बागडावे
जे ही बरे वाईट मिळाले आपल्याला
कुरबुर न करता मनःपूर्वक स्वीकारावे
चूक बरोबर जे ही घडले हातून
ते स्वतःचेच स्वतःला नीट कळावे
अंधार दूर करण्यासाठी सभोवतीचा
दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सतत जळावे
