योग्यता
योग्यता
कष्टानुरूप योग्यता ठरलीच पाहिजे
मिळायला नको सगळेच इतके स्वस्त
कानात वारा शिरतो आळश्यांच्या
मिळाले जर त्यांना योग्यातेपेक्षा जास्त
मुढ लोक उगाच वाचाळता करतात
योग्य जनांनाही अकारण हिणावतात
स्वतःची योग्यता तपासात नाहीत कधी
उथळपणाने उगाच शक्ती क्षीणवतात
आधी होती दासी, तिज केले पट्टराणी
मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहिना
या उक्तीतच सामावलेले आहे सगळे काही
अयोग्य व्यक्तींच्या स्वभावाचा सारा मायना
चार हात दूरच राहायला हवे अशा मुढांच्या
त्यांच्या सावलीलाही उभे नं राहिलेले बरे
खोटे शिक्के चलनातून बाद करता करता
बाद होता कामा नये नाणे जे आहेत खरे
