महायज्ञ
महायज्ञ
1 min
269
भाबड्या भावनांच्या निद्रेतून
मन अचानक खडाडून जागलं
बाहेरून लक्षात आलं नाही
मनाला काय बोचलं काय लागलं
कोणाच्याही साथीची अपेक्षा नं
ठेवता शोधायच्या आपल्या वाटा
कितीही शांत वाटत असलं तरीही
मनात उठतात भावनांच्या उंच लाटा
आशा निराशेच्या हिंदोळ्यावर असतं
सतत वाऱ्यागत उडतं हे चंचल मन
खोलवरच्या जखमा भरून निघतात
मागे सोडतात कायमस्वरूपी व्रण
अट्टाहास धरण्यापेक्षा ध्यास धरावा
करावा मनःपूर्वक सर्वतोपरी प्रयत्न
शेवटच्या श्वासापर्यंत धगधगत ठेवा
हा लांबलचक जीवनरूपी महायज्ञ
