परीक्षा
परीक्षा
1 min
211
कलियुगात काहीही किंमत उरली नाही
सत्यवचन, कष्टाळूपणा आणि नेकीला
योग्यता असूनही योग्य तो मान सन्मान
मिळत नाही दीन दरिद्री घरच्या लेकीला
नैतिकता वगैरे फक्त बोलण्याच्या गोष्टी
आहेत,तीला प्रत्यक्षात नव्हे काही अर्थ
गरजे वेळी सर्व बाजूला गुंडाळून ठेवून
साध्य करायला बघतात आपला स्वार्थ
संकटावेळी तुमच्या हाकेला जो ओ देतो
आपला आहे जो येईल तत्परतेने धावून
कोणी काढता पाय घेतला हे ही लक्षात
असू द्या, मनात ठेवा सगळे गप्प राहून
सुख दुःखाच्या प्रसंगी कोण कसे वागते
याचे निरीक्षण करून नीट करा समीक्षा
जीवनात सर्व कसोट्यांवर तावून सुलाखून
निघावेच लागते, असते ती खरी परीक्षा
