STORYMIRROR

Swapna Wankhade

Others

4  

Swapna Wankhade

Others

आई सगळं काही करते

आई सगळं काही करते

1 min
294

सासर माहेरच्या मंडळींना

प्रेमाच्या धाग्याने ती बांधते

लेकीला माहेर असावे म्हणून

तिची आई सासरला नांदते


किती निस्वार्थ असते हे नाते

किती गहीरे आहेत ऋणानुबंध

मी पणा कायम बाजूला सारून

जिवापलीकडे जपते ती संबंध


आपले थोडेसे ही दुःख बघून

अश्रू तिच्या डोळ्यांतून गळते

आपल्यापेक्षा कित्येक पटीने

जास्त काळीज आईचे जळते


लेकराचे सर्वकाही करतांना

अख्खे जीवन जीचे सरते

सर्वार्थाने हे सत्य आहे की

आई सगळं काही करते


Rate this content
Log in