सोंगट्यांचा खेळ
सोंगट्यांचा खेळ
1 min
367
कितीही सगळ्यांची मनं जपली
तरीही येऊ शकते नात्यात वितुष्ट
प्रत्येकाला आवडेल असेच करणे
कठीण, सगळेच नसतील संतुष्ट
आवश्यक नाही प्रत्येक वेळी
होईल सगळे काही मनासारखं
जीवनाच्या लांबलचक प्रवासात
ठरेल कोण आपलं कोण परकं
ध्येयाचा ध्यास घेणे योग्य आहे
अती महत्त्वाकांक्षा बरी नाही
आपले निर्णय विचारपूर्वक घ्या
सल्ले देणारे बोलले जरी काही
भिन्न भिन्न स्वभावामुळे नाही
जुळत प्रत्येकवेळी ताळमेळ
कधी कधी भासते सर्व जग
जणू आहे सोंगट्यांचा खेळ
