सत्संग
सत्संग
1 min
262
भाषणात लोक फार बोलतात
आळवतात मोठ मोठाली तत्व
असे लोक कृतीशून्य असतात
प्रत्यक्षात स्वार्थाला देतात महत्त्व
फार कमी लोक असतात जे
खरोखर कार्य करतात अतुल्य
इतके सोपे नसते कलियुगात
जपणे आयुष्यभर नैतिक मूल्य
बोलघेवड्यांवर फार भाळू नये
बनू नये त्यांच्या हातचे बाहुले
संत तुकाराम म्हणतात, बोले
तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
सकारात्मक आवडी जपाव्या
असावा वेगळ्या छंदांचा व्यासंग
कुवृत्तीच्या लोकांना दूर सारून
करावा सज्जनांसंगे सदैव सत्संग
