पडझड
पडझड
1 min
261
बघवत नाही आसवांच्या धारा
सहन होत नाही आत्म्याचे ह्रदन
कोणाला समजेल वेदना मनाच्या
करावे कुठे मनाचे दुःख कथन
अस्थिरता पसरली आहे सर्वत्र
सैरभैर झाले चित्त आणि मन
मानवी समाज होरपळतो आहे
जसे जळते वणव्यामुळे वन
भोवतीचे दृश्य बघून अक्षरशः
हृदय चरा चरा जातेय चिरले
कलाटणी घेतली आहे जीवनाने
एकशे एंशीच्या कोनात फिरले
प्राणवायू अभावी श्वास कोंडतोय
होतेय जीवाची आतोनात धडपड
केव्हा थांबेल हा आक्रोश मानवाचा
देवा थांबव ही जीवनाची पडझड
