मुलगी
मुलगी
मनामध्ये असंख्य प्रश्नांनी धूमाकूळ घातलाय,
चूक बरोबर काय समजत नाहीये,
माझ्या प्रश्नांची उत्तरे भेटत नाहीये,
माणूस म्हणून जगायला अता इच्छा नाहीये.
का मला जन्माला घातल?
का माझ बालपण हिरावून घेतल?
का लहानपणी मला सोडून गेले?
का का म्हणता म्हणता माझ सुख हिरावून घेतल?
एक मुलगी होण म्हणजे खुप मोठी चूक केली का?
एका मुलीला तिला पाहिजे तस जगू देत नाय का?
खुप सारे प्रश्न मी मुलगी म्हणून जन्माला आल्यापासून येत आहेत,
कोणाला माझी दया येत नाय का?
का मी माझे निर्णय घेऊ शकत,
का माझा विचार लोकांसमोर मांडू शकत,
काही झाल तरी मी हक्क नाही दाखवू शकत,
मी माझे प्रश्न कोणासमोर बोलून नाही दाखवू शकत.
मी एकटी पडलीये अस नाय दाखवू शकत,
माझ्या मनातल्या वेदना नाय दाखवू शकत,
माझ मन खूपश्या गोष्टींच उत्तर मागत आहे,
पण का मी कोणाला काहीच नाय सांगू शकत.
