बाबा
बाबा
बाबांनी मला कधी कमी पडू दिल नाही,
प्रत्येक गोष्टीत माझी काळजी करण कधी सोडल नाही,
प्रत्येक परिस्थितीत त्यांनी धीर कधी सोडला नाही,
स्वत: उपाशी राहून समोरच्याच पोट भरण त्यांनी कधी सोडल नाही,
समोर एक मागे एक बोलायची सवय त्यांची नाही,
त्यांना न आवडलेली गोष्ट स्पष्ट बोलल्याशिवाय त्यांना जमत नाही.
बाबा तिच व्यक्ती जो मुलीला जे पाहिजे ते दिल्याशिवाय राहत नाही,
बाप या दोन शब्दात सगळ जगाच सुख दिसल्याशिवाय राहत नाही,
बाबा घरच्यांसाठी काबाड कष्ट करतो,
बाबा उन-पावसात काम करतो,
बाबा डोक्यावर ओझे वाहतो,
बाबा स्वत:साठी काही न घेता मुलांचे हट्ट पुरवतो.
बाबा मुलांना आनंद मिळावा म्हणून ओझे वाहतो,
बाबा स्वत:साठी जगत नसतो,
बाबा हा व्यक्ती जो स्वत:पेक्षा घरच्यांचा विचार करतो
बाबा स्वत: उपाशी राहून मुलांसाठी जगतो.
बाबा हा तोच व्यक्ती मुलीच्या लग्नात अश्रू लपवत असतो,
बाबा जगाला दाखवण्यासाठी खुप खूष असतो,
मुलीने न मागता त्यांनी हट्ट पुरवलेला असतो,
का आपण कोणीच कधीच त्या बाबांना काय हव? नको? बघत नसतो?
