पालवी
पालवी
एक छोटंसं रोप ते,
शांत बसलं होतं ते,
का माहीत नाही पण बोलत नव्हतं ते,
सुकून गेलं होतं, फांद्या वाळून गेलं होतं ते,
झाड डोकावून आकाशाकडे बघत होते,
जणू काही ते आकाशाला विनवणी करत आहे,
आता तरी मेघराजा खाली बरसून ये,
आता तरी मला नवी पालवी फुटू दे,
अचानक बघता बघता पावसाने त्या रोपाची विनवणी ऐकली,
धो धो मेघराजा बरसू लागला,
कितीही काही झालं तरी मी बरसणार सांगू लागला,
आकाश आणि पावसाने संगत करुन बरसू लागला
नवीन पालवी फुटून रोप आनंदाने डोलू लागले,
प्रत्येक रोप आनंद सोहळा साजरा करु लागले,
सगळे मिळून आज संकल्प करु लागले,
काही झालं तरी आम्ही झाडे वाढवू, झाडे जगवू जगाला सांगितले
