STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Inspirational

3  

Laxmidevi Reddy

Inspirational

लक्ष

लक्ष

1 min
431

लक्ष एक या जगात काहीतरी करुन दाखवायचय,

सगळ्या कष्टांना हसत सामोरे जायचय, 

संकटांना घाबरून पळून नाही जायचय,

भूतकाळ विसरून आनंदाने आयुष्य जगायचय,


खूप गोष्टी घडत असतात आयुष्यात पण न डगमगता आयुष्य जगायचय,

भूतकाळ आठवून रडत न बसता आपण काय नवीन शिकलो याचा विचार करायचाय,

कोणी सोबत असू नसो आपल आयुष्य आनंदाने जगायचय,

जन्माला ऐकटे आलो पण जाताना सगळ्यांच होऊन जायचय,


प्रत्येक पायरी चढताना खूप सारे संकट येणार,

प्रत्येक गोष्ट करताना पाय खेचणारे लोक भेटणार,

प्रत्येक गोष्टीचा आनंद तेवढाच करा जेवढ सहन करता येणार,

प्रत्येक गोष्ट करताना मी शंभर वेळा विचार करून पुढे पाय टाकणार,


मी आणि तू करत बसण्यापेक्षा जगात सगळ्यांपेक्षा वेगळ करून दाखवणार,

भांडणात वेळ घालवण्यापेक्षा नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साह दाखवणार,

तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला आनंद मिळणार, 

तरी पण एकच सांगते वेळ वाया न घालवता चांगल्या कामासाठी घालवणार... 

                     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational