STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Abstract Classics Others

3  

Laxmidevi Reddy

Abstract Classics Others

दूर गेलेले गाव

दूर गेलेले गाव

1 min
108

 दूर गेलेले गाव आठवताना

आठवण तुझी येते,

डोळे भरून येताना,

तूच मनी येतो


चिंब भिजलेल्या डोळ्यामध्ये,

धुरकट तुझा चेहरा दिसतो,

का कोणास ठाऊक तू तिकडे असता,

तूच सगळीकडे असल्याचा भास होतो...


प्रेम म्हणजे काय दूर गेल्याशिवाय,

समजत नाही हे खरं असतं,

तुझ प्रेम जपताना काय करावं,

कधीच समजत नसत..


तुझ्या प्रेमापोटी कित्येक दिवस,

जागी राहिले हे सांगू शकत नाही,

जगाला दाखवता येईल,

इतकं कमी माझ दुःख नाही..


माझ्या रिकाम्या आयुष्याला,

साथ आता तुझीच रे,

पलटून बघ माझ्याकडे,

माझ्या आयुष्याला गरज तुझीच रे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract