STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Others

3  

Laxmidevi Reddy

Others

भक्ती

भक्ती

1 min
183

देवा धाव घे रे,

खाली उतरून ये रे,

भक्तांसाठी धाव घे रे,

भक्तांच्या हाकेला ओ दे रे,

देव दगडात नसतो रे,

देव प्रत्येकाच्या मनात असतो रे,

मनाच्या नजरेने बघ देव दिसतो रे,

देव तुझ्या माझ्या तर सगळ्यामध्ये असतो रे,

देव जाऊ शकत नाही म्हणून आई बनवली रे,

त्या आईची मनापासून काळजी करा रे,

आईला वात्सल्याची मूर्ती समजा रे,

आईलाच देवासमान समजून पुजा करा रे,

आई आणि देव यामध्ये फरक नको रे,

आई आणि देवाची मनोभावे भक्ती कर रे,

देवा भक्तासाठी धावून येण्याचा प्रयत्न कर रे,

भक्ता तू निस्सीम भक्ती मनी ठेव रे,

भक्ती म्हणजे देवधर्म नाही रे,

मनोभावे देवाची पुजा करण नाही रे,

मनी असता लोभ देव धावून येत नाही रे,

देव देव करत बसण्यापेक्षा तूझे प्रयत्न सोडायचे नाही रे,

प्रयत्न करत रहायच एवढ एकच लक्ष मनी ठेवा रे,

देवाची मनोभावे पूजन करायच एवढच मनात ठेवा रे,

संकटांना समोरे कसे जायचे हे ध्यानात ठेवा रे,

देवाच नामस्मरण मुखी ठेवा रे


Rate this content
Log in