मैत्री
मैत्री
सांडलेली मैत्री पुन्हा एकदा भरेल का
परत एकदा हात तुझा खांद्यावरती दिसेल का !!
बिनबुडाचे आरोप करुनी तू मोकळा झालास
कदाचित मी यामध्ये कधी निर्दोष सुटेल का !!
चूक कोणाची झाली हे कोणास उमगले नाही
सत्य ऐकुनी घ्यावयास मन तुझे झुरले का !!
तुझिया कर्णामध्ये असा जहर कोणी भरला
मज वरचा विश्वास उडण्या तेवढे विष पुरले का !!
जगणं सहन होत नाही मरणही मज येत नाही
हसतमुख जगण्याचे आयुष्य आता उरले का !!
आनंदाने वाहणारी जलदा ही आटून गेली
सुख दुःखाचे सारे अश्रू क्षणात असे विरले का !!
मृत्यूपर्यंत सोबती राहू एकमेकांचे वादे होते
हे स्वप्न शेवटी वाऱ्यावरती जिरले का !!
सांगणे शक्य नाही कोणत्या वळणावर भेटू
माझे मुख पाहायचे नाही हे तुझे ठरले का !!
