स्त्री
स्त्री
1 min
154
वाटत राहते सारखे,
निसटून गेले सगळे काही
मागे वळून बघताना।।
चुकले का सगळे निर्णय
आयुष्याचे इतरांची
मने आपण जपताना।।
समोर येणाऱ्या प्रत्येक
क्षणांना भरभरून
जगायचेच विसरले।।
उद्याच्या सुखासाठी
आजचा आनंद घ्यायचा
हेच कस विसरले।।
