गोष्ट
गोष्ट
प्रत्येकाची एक गोष्ट असते, सांगण्यासारखी...
काहीजण शब्दांत गुंफवतात तर काहीजण हृदयात.....
काहींना आवडतं भावना व्यक्त करणं,
काहींना वाटते भीती, भावना दुखावण्याची....
काही दाखवतात गालावर हास्य, मनात दुःख असूनही,
काही लवपतात स्वतःलाच, स्वतःच्या दुःखापासून.....
काही म्हणतात, आयुष्य खूप सुंदर आहे
पण काहींना प्रश्न पडतो, आता कसं जगायचं यार ?.....
हीच तर आयुष्याची खरी मजा आहे
कोणाला सांगायला आवडतं, तर कोणाला लिहायला.....
पण खरंच ,
प्रत्येकाची एक गोष्ट असते, सांगण्यासारखी
काहीजण शब्दांत गुंफवतात, तर काहीजण हृदयात......

