||प्रीतीचा पाऊस||
||प्रीतीचा पाऊस||
निळ्या नभाच्या अंगणी, लई काळोख मातला|
पावसाच्या थेंबासाठी, मेघ आकाशी थांबला||धृ।।
आला वाजत गाजत, माझा प्रीतीचा पाऊस|
चिंब भिजून जाईल, माझी मनातली आस||
प्रीत फुलविण्यासाठी, मनी बांधला बंगला|
ताल धरून नाचेल आता, पाऊस चांगला||१।।
गेला पाऊस पडून, ओली झाली चिंब माती|
कशी फुलारून येईल आता, तरारुन शेती||
वेली फुल झाड सारी, कशी डोलती खुशीत|
जसा प्रीतीचा मोगरा, फुले मनाच्या मनात||२।।
रिमझिम पावसात, धरा मनात लाजते|
शालू नेसून हिरवा, गोड गालात हासते||
कशी बहरली काया झिंक मनात उठली|
जणू प्रितीच्या फुलात, कोण अत्तर फेकली||३।।