STORYMIRROR

Rajesh Sabale

Horror

3  

Rajesh Sabale

Horror

गुपचिप बसा की घरी

गुपचिप बसा की घरी

1 min
176

लावून नाका तोंडाला मास्क, हात पाय धुवा की स्वारी।।

आ हो आला कोरोना दरी, गुपचिप बसा की घरी।।


आईचा ओरड खाऊन बापुस, घरात बसून राही।

घरात बायकोबाहेर पोलीस, इलाज काहीच नाही।।

घर बंद करून सगळे, बसलेत चिंतेत सारी।

आ हो आला कोरोना बाहेर, गुपचिप बसा की घरी।।


मोबाईल हाती घेवून, मित्रांशी बोलाया जाता।

बुडाशी ठेवली भाजी, निवडून द्यावा की आता।।

डोक्याला ताप झालय नुसता, रिकामा राबतोय घरी।

आ हो आला कोरोना बाहेर, गुपचिप बसा की घरी।।


बापाची बोलती बंद म्हणुनी, गण्याला आनंद होई।

शाळाही झाली बंद म्हणून, गण्याला अभ्यास नाही।।

आई ओरडता बापाला, मग गाण्याला वाटतया भारी।

आ हो आला कोरोना बाहेर, गुपचिप बसा की घरी।।


गण्या सांगतेसे बापा, आता सांगा की एखादी गोष्ट।

नाही पळायला जागा बाबा, आपली आई हाये खाष्ट।।

बापाचा झालय गोंधळ सारा, बोलायची झाली चोरी।

अहो आला कोरोना बाहेर, गुपचिप बसा की घरी।।


फोन करून थकलाय, गण्याचा बापुस लई।

कोणी मित्र बोलणा, नाक्यावर येता का भाई।।

आईला म्हणे बापुस माझा, फिरायला येते का दारी।

आ हो आला कोरोना बाहेर, गुपचिप बसा की घरी।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror