टेकडीवरचे भूत
टेकडीवरचे भूत


रात्रीच्या वेळ जाऊ नका टेकाडावर सांगत होते सारे .....
त्यांना न जुमानता मी निघालो होते माझ्यात किडे .......
अंधार होता किर्रर्र आणि धुके होते दाट.....
थंडी ने वाजून दात कापत होते माझे हात .....
चाललो होतो रस्त्याने एकटा नव्हता कोणता दिवा ......
मनात आले अरे कोणी तरी थांबवा .......
थोडे पुढे जाता वाटेत भेटला एक सोबती ......
त्याला पाहून हुरूप आला आता नाही कोणाची भीती ......
चालताना त्याने मागितली चुन्याची डबी आणि तंबाकू पुडी ....
मी खात नाही म्हणता म्हणाला कसे जगता राव तुम्ही .....
माझी तर सवय अजून नाही सुटली .....
मरून मला आता तीन वर्ष लोटली ......
त्याचे वाक्य ऐकून आले मला हसू ....
काय तुम्ही मस्करी करता बापू .....
मस्करी नाही आहे हे खरे ......
ह्या टेकाडावरून मारून उडी संपवले आयुष्य सारे .....
माझा नव्हता विश्वास वाटले मला खोटे .
.....
लक्ष जाता पायाकडे ते होते उलटे .....
मी त्याला दिले अलिगन आणि म्हणालो एकसाथ एकत्र राहू .....
आणि जे कोणी इकडे रात्री येतील त्याला भीती दावू .....
मी म्हणालो लोटले मला पण मरून वर्ष .....
तुझ्यासारखा भूत मित्र भेटला झाला मला हर्ष ......
इकडे संपवले होते माझी जीवन मी भर दुपारी .....
सारखी कट कट करत होती माझी कारभारीण .....
आता नाही चिंता मला कोणाची ......
एक भूत भेटले दुस्र्याला झाली दोस्ती माझी .....
आता आम्ही लोकांना असतो घाबरवत ......
जो येईल रात्रीचा त्याला असतो पळवत .....
या भेटयाला तुम्ही आपण करू धमाल .....
मैत्री असेल आपली भारी भूत आणि माणूस म्हणजे एकदम कमाल .....
मित्रानो आत्महत्या करणे आहे पाप .....
समस्यांचा सामना करा प्रश्न सुटतील आपोआप .....
बाकी कविता कशी वाटली सांगा नक्की .....
जर तुम्हाला आवडली तर होईल आपली पण मैत्री होईल पक्की ....