STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Inspirational Others

3  

कुमार भयकथासूर

Inspirational Others

बाई होणे नाही सोपी गोष्ट

बाई होणे नाही सोपी गोष्ट

1 min
171


बाई होणे नाही सोपी गोष्ट ....

तिच्या नशिबी असतात सर्वात जास्त कष्ट...


जन्माला येते जेव्हा पोर नसते कोणाला हवीशी ....

म्हणून जेव्हा करतात नामकरण नाव ठेवतात नकोशी ....


लहानपण निघून जाते बोलणी खाण्यात ....

जसे ती आहे पाप आणि काही नाही तिच्या जगण्यात ...


बाप कधी वागवत नाही प्रेमाने ना म्हणत बेटी ....

त्याचा मते हि तर दुसऱ्याच्या धनाची पेटी ....


येते जेव्हा वयात पोर असतो आईच्या जीवाला घोर ....

नेहमी बाहेरचे नाही तर काही घरात पण असतात तिला वाईट नजरेने पाहणारे चोर ....


लग्ना नंतर सुद्धा तिच्या मनात असते दुज्याभावाची ज

खम भळभळत ......

आधी बाप नंतर नवरा असते ह्याची मर्जी असते सांभाळत .....


हळू हळू संसार सुरु होऊन मुले होतात मोठी ....

बापाचे पाहून ते सुद्धा सुनवतात आई ला खरी खोटी ....


म्हातारपणी सुद्धा तिची व्यथा होत नाही कमी .....

वृद्धाश्रमांत टाकून मुलगा घेतो तिला सांभाळण्याची हमी .....


एवढे सर्व सहन करत ती असते जगत....

आपले दुःख कोणाला नाही बसत सांगत .......


शेवटच्या क्षणी तिचे एकच असते मागणे .......

पुन्हा बाई म्हूणन नको आहे मला जगणे ......


बाई होणे नाही सोपी गोष्ट ......

तिच्या नशिबी असतात सर्वात जास्त कष्ट.......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational