STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Others

3  

कुमार भयकथासूर

Others

कर्तव्य

कर्तव्य

1 min
186


झाले तीन वर्ष नाही गेलो मी घरी ...

आई माझी डोळे लावून बसली आहे वाटेवरी ...


पाहून तिचा चेहरा असे वाटते लोटला काळ ....

ती सुद्धा करत असेल विचार सुखरूप असेल ना तिचे बाळ .....


निघताना होते बापाच्या डोळ्यात पण आसू ....

पाहत होते मला ते आणून चेहऱयावर उसने हसू .....


मातपिता पेक्षा मोठी आहे देश सेवा ....

माझ्या वडिलांकडून मिळालेला हा ठेवा ....


लहान असताना पाहिले होते बाबाला येताना तीन चार वर्षाने घरी .....

देशात सर्व सुखरूप रहावे म्हणून पहारा करत होता सीमेवरी .....


काय झाली असेल त्याची अवस्था पार पडतान कर्तव्य ....

रोज येणारा कसा असेल दिवस काय असेल त्याचे गंतव्य....


p>

निघत असताना बहिणीच्या डोळ्यात सुद्धा होते पाणी ....

पुढील वर्षी लग्नात तिच्या नसावी कोणती आणीबाणी ....


राखी साठी नाही गेला हात पुढे झाली तीन वर्ष .....

ओवाळणी पाहताना दिसला नाही तो हर्ष .....


पत्रानेच कळते सर्वांची खुशाली ख्याली .....

बस अजून काय् लिहू गस्तीवर जायची वेळ झाली .....


भारत मातेच्या समोर सर्व नाती ठेऊन बाजू .....

आम्ही होतो आपल्या देशाच्या सेवेत रुजू .....


दुख आहे घरी जायला नाही मिळत ह्याचे .....

आमच्या मुळे अनेक परिवार सुखाने झोपतात रातीचे .....


देशसेवेच्या ह्या खडतर व्रताला माझा आहे सलाम.....

ज्यांच्या पोटी हा जवान जन्मला त्या मात पित्याला माझा प्रणाम......


Rate this content
Log in